किमयागार - 23

  • 2.2k
  • 1
  • 1.1k

किमयागार- किमयागिरीएक दिवस मुलाने सगळी पुस्तके इंग्रजाला परत केली. इंग्रजाने अत्यंत उत्सुकतेने व उत्तराच्या अपेक्षेने त्याला विचारले, तू यातून काही शिकलास का?. इंग्रजाला कोणीतरी बोलण्यासाठी हवे होते कारण त्याच्या मनात सतत युद्धाबद्दल विचार येत होते व त्याला बदल हवा होता.मला समजले की, या जगाला एक आत्मा आहे.ज्याला हे समजेल त्याला वैश्विक भाषा कळेल. मला लक्षात आले की अनेक किमयागारांनी आपले आयुष्य आपले भाग्य शोधण्यात घालवले आणि त्यांना जगाचा आत्मा, परिस व अमृत याचा शोध लागला.इंग्रज निराश झाला. वर्षानुवर्षे चालू असलेले संशोधन, विशिष्ट खुणा, चिन्हे, विचित्र शब्द, प्रयोगशाळेतील साहित्य या सगळ्या गोष्टींचा मुलावर काही परिणाम झालेला दिसत नव्हता. त्याने सर्व पुस्तके