किमयागार - 17

  • 2.7k
  • 1.5k

तो व्यापाऱ्याचा निरोप न घेताच निघाला. त्याला इतर लोक तिथे असताना रडणे नको होते. त्याला या जागेची आणि इथे शिकलेल्या गोष्टींची नेहमीच आठवण येणार होती. आता त्याला पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास आला होता. आणि आपण जग जिंकू शकू असे त्याला वाटत होते.किमयागार -शकुन की योगायोग?तो मनात म्हणाला, ' पण मी तर मला माहित असलेल्या ठिकाणी चाललो आहे. माझ्या कळपात परत जाऊन मेंढ्यांची काळजी घेणार आहे.'हे जरी तो मोठ्या खात्रीने बोलला असला तरी तो त्याच्या निर्णयाबाबत समाधानी नव्हता. तो जे स्वप्न खरे करण्यासाठी वर्षभर झटला होता, ते आता त्याला विशेष महत्वाचे वाटत नव्हते. कारण खरेतर ते त्याचे स्वप्नचं नव्हते. खरेचं क्रिस्टल व्यापाऱ्याप्रमाणे