मायाजाल

  • 8.3k
  • 2
  • 3.3k

मायाजाल ही कथा काल्पनिक असून ह्याचा योगायोगाशी काहीही संबंध नाही आहे. आणि त्यामुळे माझा अंधश्रद्धा पसरवण्याचा काहीही हेतू नाही.          आज अमावस्या होती आणि अशोकच्या आईने घरावरून नारळ ओवाळून काढला आणि तो तिट्यावर जाऊन फोडला. आता तुम्ही म्हणाल, अशोक म्हणजे कोण? अशोक हा २५ विशीतील मुलगा. पातळ केस, उंच बांधा, रंग गोरापान, दिसायला देखणा आणि हुद्दयानें तलाठी होता. कमी वयातच त्याने खूप यश मिळवले होते. आई व वडिलांची अभिमानाने मान त्याने आपल्या कर्तृत्ववाने उंचावली होती. आणि ह्या गोष्टीचा त्या दोघांना खूप गर्व होता. त्यामुळे गावातील लोक त्याला आपुलकीने मान देत असे. त्याचे आई वडीलही गरीब परिस्थितीतून वरती आले