कोर्टातला दिवस चांगला जाऊन सुध्दा पाणिनी बेचैन होता. आपल्या ऑफिसात येरझऱ्या घालत होता. “ काहीतरी गडबड आहे,सौम्या ” “ नेमकं काय झालंय सर ? ” “ त्या शेफाली खोपकर च काय कळत नाही.” “ सर, तुम्हाला तिच्याकडून काहीच निरोप नाही? ” “ नाही ना ! तुला वाटतंय ना गोरक्ष भेटला असेल तिला म्हणून? ” पाणिनी म्हणाला. “ शंभर टक्के. आधी माझ्याशी तो उर्मटपणे वागत होता, त्रास देत होता, पण जेव्हा मी त्याला शेफाली खोपकर च्या आर्थिक स्थिती बद्दल सांगितलं तेव्हा गरम बटाटा चटका बसल्यावर आपण जसं हातातून टाकतो ना तसंच त्याने मला सोडून दिलं. ” –सौम्या “ दिसायला कसा आहे?