किमयागार - 15

  • 3k
  • 1.7k

व्यापारी म्हणाला येथे खुप ठिकाणी चहा मिळतो. मुलगा म्हणाला आपण क्रिस्टल ग्लास मधून चहा देऊया, लोक चहाचा आस्वाद घेतील आणि ग्लास विकत घेण्यास तयार होतील. लोक नवीन व छान काही दिसले की खुश होतात. व्यापारी यावर काही बोलला नाही. त्या दिवशी दुकान बंद झाल्यावर व प्रार्थना म्हणून झाल्यानंतर हुक्का पित असताना व्यापाऱ्याने मुलाला बोलावले व विचारले तुझ्या मनात तरी काय आहे ?. मुलगा म्हणाला मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मला मेंढ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी पैसे मिळवावे लागतील. व्यापाऱ्याने एक मोठा झुरका घेतला व म्हणाला मी हे दुकान तीस वर्षे चालवतोय. मला क्रिस्टल बाबत पूर्ण माहिती आहे . लोकांना