पालकांच्या धमक्या कुसंस्काराला बळ देतात? पुर्वी पालक हे सुज्ञतेनं वागायचे. धमक्या द्यायचे नाहीत. उलट म्हणायचे की सर हा अभ्यास करीत नाही. आपण याला चांगला चोप द्या. मग काय शिक्षकांचा रुळ आणि मुलांची पाठ. त्यानंतर ती पाठ सुजलीच म्हणून समजा. त्यातच कोणी सांत्वनाही देत नसत. एक शाळा होती व त्या शाळेत हिंदीचे शिक्षक काही चुकले तर बेदम मारायचे. त्यांच्या जवळ एक पिशवी होती. त्याच पिशवीत एक लहानशी काठी होती. त्या काठीला सर टप्पू म्हणत असत. एखाद्या विद्यार्थ्यांचं काही चुकलं रे चुकलं की बस. अशातच एका मुलीचं चुकलं. मग काय तिला शिक्षकांनी धू धू धुतला. ती जशी जशी रडायची. तसे तसे सर