मल्ल प्रेमयुद्ध - भाग 75 (समाप्त )

  • 2k
  • 936

मल्ल प्रेमयुद्ध (समाप्त )हॉस्पिटलच्या समोर गाडी थांबली आणि वीर पळत सुटला कसलाही विचार न करता. डोळ्यासमोर फक्त क्रांती दिसत होती . काय झालं असेल नेमकं ..? या विचाराने तो अक्षरशः धावत होता.देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाहीसांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काहीदेवा कुठं शोधू तुला मला सांग नाप्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हादेवा काळजाची हाक ऐक एकदा तरी…माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी……आरपार काळजात का दिलास घाव तूदगडाच्या काळजाचा दगडाचा देव तूका रे तडफड ही ह्या काळजा मधीघुसमट तुझी रे होते का कधीमाणसाचा तू जल्म घे,डाव जो मांडला मोडू देका हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागेउत्तरांना प्रश्न कसे हे