किमयागार - 12

  • 3.2k
  • 1.9k

भाग ११ मध्ये मार्केटमधील प्रसंगामध्ये काही भाग पोस्ट करायचा राहिला होता तो आता पाठवत आहे. क्षमस्व. किमयागार - मार्केट मुलगा कोणीतरी हलवल्यामुळे जागा झाला. तो मार्केटमध्ये झोपला होता आणि मार्केट परत चालू होऊ लागले होते. तो आपल्या मेंढ्यांना शोधू लागला. त्याच्या लक्षात आले की तो आता नवीन जगात होता. आता मेंढ्यांसाठी चारा पाणी शोधायचे नव्हते.‌ आता तो खजिन्याच्या शोधात जाणार होता. त्याच्या खिशात एक पैसाही नव्हता पण श्रद्धा व आत्मविश्वास होता. त्याने रात्रीच ठरवले होते की हिरो फक्त पुस्तकात नसतात. तो साहसी माणूस होणार आहे.तो मार्केटमध्ये हळूहळू चालू लागला. व्यापारी त्यांची दुकाने लावत होते. मुलाने एका मिठाईवाल्याला दुकान मांडण्यात मदत