कोरोना

  • 2.3k
  • 919

कोरोना कादंबरी अंकुश शिंगाडे नागपूर ते गाव फारच सुंदर होतं. सुसंपन्नता त्या गावात नांदत होती. गावातील लोकंही चांगले होते. तसं पाहिल्यास गावात सुसंपन्नता असल्यानंच की काय, गावातील लोकं एकमेकांना मदत करीत असत. गावात एक नदी होती. त्या नदीचं नाव इरावती होतं. ही नदी बारमाही वाहात होती. त्यामुळं की काय, त्या नदीच्या आजूबाजूला जी जागा पसरली होती. त्या जागेवर सदैव हिरवळ राहात असे. तसंच आजूबाजूला जी झाडं होती. तिही हिरवीकंच होती. लोकं या नदीच्या किना-यावर शेती करीत. कोणी कोणी नदीतही शेती करीत. जी मंडळी नदीत शेती करीत. त्या शेतीत ते कलिंगड, डांगरं, खरबुज लावत असत. कोणी कोणी तर दोडके अन् गलगल्यांचंही