रक्त पिणारी जात ते घर.........आज त्या घराला घरपण नव्हतं. कारण त्या ठिकाणी जी माणसं पुर्वी राहात होती. ती माणसं आता दिसत नव्हती. आता त्या माणसांमध्ये गोडवा नव्हता, ओलावा व जिव्हाळाही नव्हता. ते संयुक्त कुटूंब. त्या कुटूंबात माहिरा आपल्या दोन बहिणी व दोन भावासमवेत राहात होती. त्या कुटूंबात काकाकाकू व आजीआजोबाही अगदी गुण्यागोविंदानं राहात होते. घरात अगदी खेळीमेळीचं वातावरण होतं. माहिराही शाळा शिकत होती. ती लहान होती. ती शाळेत जात असतांना तिला तिच्याच बहिणी शाळेत नेवून देत असत नव्हे तर तिला मदत करीत. आज माहिरा मोठी झाली होती. तिचा विवाहही झाला होता. त्याचबरोबर तिच्या बहिण भावाचाही विवाह झाला होता. तेही आपआपल्या