कोरोना रिटर्न तो ओसाड रस्ता आज अगदी भयाण वाटत होता त्यांचे आज अश्रू सुुकलेले होते. कधी न पाहिले तेवढेे मृतदेह आज अनुभवायला मिळत होते. अख्ख्या देशात कोरोनाचं सावट निर्माण झालं होतं. मृत्यूही आज स्वस्त झाला होता. कधी ऑक्सीजन लीक होवून तर कधी रुग्णालयाला आग लागून तर कधी रस्तेे अपघातात लोकं मरण पावत होते. स्मशानात पाहिलं असता कधी नसेल पाहिली एवढी मुदड्यांची रांगच रांग होती. लोकांनी आजपर्यंत फक्त राशनची रांग पाहिलेली होती. नुकत्याच शाळा सुरु झाल्या होत्या. शाळा सुरु व्हायला एक महिनाही झाला नव्हता. कोरोना हलक्या प्रमाणात सुरु होताच. तो संपेल अशी चिन्ह दिसत होती. तोच कोरोना नवं रुप बदलवून आला.