राजा दाहिर

  • 3.4k
  • 1.5k

राजा दाहिर तो काळा दिवस होता त्या सिंध प्रांतियांसाठी. कारण त्यांचा राजा मरुन गेला होता. आज सिंध पाकिस्तान मध्ये आहे. परंतू त्या राजाच्या बलिदानाची कहाणी आज पूर्ण जगात जन्म घेत आहे. दाहिर राजाचा तो इतिहास राजासाठी गौरवशाली गोष्ट आहे. आज ती कहाणी भारतीय लोकांच्या भावनेचं प्रतिक बनली आहे. या अखंड हिंदुस्थानात पुष्कळ सारे हिंदू राजे पैदा झाले. ज्यांनी आपल्या वतनासाठी कुर्बानी सुद्धा दिलीही असेल, परंतू आपल्या वतनाला विकलं नाही. शरणागतीही पत्करली नाही. ते खुप लढले. मृत्यू पावले. वतनासाठी कटलेदेखील. परंतू आपल्या वतनाला झुकू दिलं नाही. आपल्या मातृभुमीला त्यांनी नमन केलं. धर्मासाठी लढले. वीरगतीस प्राप्त झाले. पण धर्म बदलविला नाही. असाच