कर्णपिशाचीनी

  • 7.1k
  • 1
  • 3.1k

कर्णपिशाचिनी स्वामी महाराजांचे ध्यान संपवून मी नुकताच उठलो होतो एवढ्यात फोन वाजला, अबू होते फोन वर "अविनाश एकधारी लिंबू, थोड्या लाल मिरच्या व मोहरी एका पोटलीत बांधून गेट ला टांगून ठेव एक विचित्र वल्ली तुला भेटावयास येत आहे". फोन बंद झाला. त्यांनी सांगितलं तस करून मी स्वामी महाराजांचे नामसमरण करत सोफया वर बसलो. काय प्रकार होता देव जाणे , इतक्यात गेट वाजलं काळा कुडता, काळा पायजमा , गळ्यात कवड्यांची व हाडांची माळ, असा एक ३० ३५ शी चा तरुण आत येत होता , त्याचा बरोबर असलेली स्त्री मात्र बाहेरच उभी होती, तिच्या चेहेऱ्यावर संताप उद्विग्नता स्पष्ट दिसत होती. मोठ्या कष्टाने