किमयागार - 8

  • 4.1k
  • 2.6k

त्याला अंदालुसीआ मधील सर्व कुरणे, मैदाने माहित झाली होती. आणि आपल्या मेंढ्यांची योग्य किंमत करणे त्याला कळू लागले होते. त्याने मित्राच्या तबेल्याकडे लांबच्या रस्त्याने जाण्याचे ठरवले. तो शहरातून जाताना एके ठिकाणी थांबला आणि एका टेकडीवर चढला. तेथून काही अंतरावरील आफ्रिका दिसत होती. त्याला कोणी तरी सांगितले होते की " मुर " लोकांनी तेथून येऊन स्पेन काबीज केले होते. तो जिथे बसला होता तेथून सर्व शहर दिसत होते, म्हाताऱ्याबरोबर ज्या चौकात भेट झाली होती तो चौक पण दिसत होता.कुठुन तो म्हातारा आपल्याला भेटला असं त्याच्या मनात आले. तो या शहरात त्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ सांगणाऱ्या जिप्सी स्त्रीला भेटण्यासाठी आला होता. जिप्सी