गीत रामायणा वरील विवेचन - 56 - गा बाळांनो, श्रीरामायण

  • 3.2k
  • 1.1k

सीता देवी वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात एक कुटी बांधून राहू लागल्या. आश्रमातील इतर मुनिस्त्रियांप्रमाणे त्यांचे जीवन व्यतीत होत होते. धार्मिक वातावरणात सीतामाईंच्या कुशीतील गर्भ हळूहळू वाढत होता. आश्रमात आपोआपच उच्च प्रतीचे गर्भसंस्कार त्यावर होत होते. रोज पहाटे उठल्यावर आन्हिक आटोपल्यावर कुलदेवतेची आराधना करताना वेदघोष सीता देवींच्या कानी पडत असत. गोदुग्ध,कंदमुळे,फळं असा आहार करून त्या दिनचर्या पार पाडत असत. वाल्मिकी ऋषींच्या पत्नी व इतर मुनी कन्या ह्यांच्याशी त्यांचा वार्तालाप होत असे. सीता देवी राज्ञी असूनही स्वतःचे कामे स्वतःच करत असत.इकडे अयोध्येत राज प्रासादात, सिंहासनावर बसून श्रीराम सुद्धा आपले राज धर्माचे कर्तव्य पार पाडत असत. व्यवहरिकदृष्ट्या जरी त्यांनी सीता देवींचा त्याग केला होता