गीत रामायणा वरील विवेचन - 54 - डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे

  • 2.6k
  • 843

रामराज्यात सगळे सुखाने जगत असतात. कोणाला कुठलेच दैन्य नसते अयोध्येत नंदनवन फुलले असते. श्रीराम-सीता देवी,लक्ष्मण-उर्मिला,भरत-मांडवी, शत्रुघ्न-श्रुतकीर्ती सगळ्यांचे संसार आनंदाने सुरू असतात. यथावकाश सीता देवी गरोदर होतात आणि त्यांना अद्भुत डोहाळे लागतात. एकदा शयनगृहात बसलेले असताना सीता देवींचा चेहरा फिकट आणि थकलेला दिसत असता श्रीराम म्हणतात,"सीते तुला काही होतेय का? काही हवंय का? तुझी चर्या थकलेली वाटतेय"त्यावर सीता देवी श्रीरामांना म्हणतात,"हे रघूकुलतीलका शब्दात सांगण्यास मला संकोच वाटतोय. पण मला आजकाल उगीच वनात जावेसे वाटते. पाखरांसारखे मुक्त विहारावे,गावे बागडावे वाटतेय. कानात बासरी चा स्वर ऐकू येतो. असे वाटते वनातील एखादे पाडस कुशीत घ्यावे त्याचे विशाल निर्मल डोळे मला फार आवडतात. त्याच्यावर मला