गीत रामायणा वरील विवेचन - 52 - त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजकार

  • 2.3k
  • 732

लंकेतून विभीषणाने दिलेल्या पुष्पक विमानातून श्रीराम,सीता देवी,लक्ष्मण,सुग्रीव व हनुमान अयोद्धेकडे निघाले. निघताना त्यांनी विभीषणाला नवीन राज्यपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण वानर सेनेचे आभार मानून त्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले. अयोद्धेकडे जाताना प्रवासात त्यांना भारद्वाज ऋषींचा आश्रम लागला तिथे ते थांबले व त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघाले त्यांना सुद्धा त्यांनी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले. पुढे आयोद्धेतून वनवासास जाताना जे जे लोकं त्यांना भेटले होते त्या सर्वांना त्यांनी परतीच्या प्रवासात अभिवादन केले. आणि अखेर ते अयोध्येत येऊन पोचले. ते येणार ह्याची वार्ता हनुमानाने जाऊन आधीच भरत यांना सांगितली होती त्यामुळे भरत आणि शत्रुघ्न ह्यांनी मिळून संपूर्ण राजप्रासाद तसेच संपूर्ण अयोध्या सुशोभित केली