कुंभकर्ण रणभूमित येताच एकच हाहाकार होतो. वानर सेनेतील वानरांचे समूह च्या समूह कुंभकर्ण गिळून टाकतो. सगळी सेना सैरभैर होते. तेवढ्यात विभीषण कुंभकर्णाला समजवायला जातो पण कुंभकर्ण त्याला तू भाऊ असून भावाला साथ न देता शत्रू पक्षात गेला असे दूषण लावून पाठवून देतो. त्यानंतर कुंभकरणाच्या हल्ल्याने सुग्रीव मूर्च्छित होतो. अंगद लक्ष्मण यांना सुद्धा तो आटोपल्या जात नाही. हनुमान त्याच्यावर प्रहार करतात तेव्हा कुंभकर्ण त्यांना गरगर फिरवून फेकून देतो ते मूर्च्छित होतात. तोपर्यंत सुग्रीव शुद्धीवर येतो तो श्रीरामांकडे जातो व म्हणतो, "प्रभू तिकडे कुंभकर्णाने हाहा:कार माजवला आहे. तो वानरांचे जथे च्या जथे गिळून टाकतो आहे. जर असेच सुरू राहिले तर एकही वानर