गीत रामायणा वरील विवेचन - 45 - शेवटचा कर विचार फिरुनी एकदा

  • 2.6k
  • 933

रामांनी समजवल्यावर सुग्रीवाला आपली चूक उमगते. रामांच्या सांगण्यानुसार सुग्रीवाने सगळ्या वानर सेनेला पाचारण केले आणि श्रीरामांनी जी युद्ध योजना आखली होती ती समजावून सांगितली. आता युद्धाला सुरू करणार तत्पूर्वी रामांनी राज धर्माला अनुसरून वालीपुत्र अंगदाकरवी रावणाकडे एक निरोप पाठवला."अंगदा! त्वरित रावणाकडे जा आणि एकदा पुन्हा विचार कर असे रावणाला जाऊन सांग.",असे म्हणून श्रीरामांनी अंगदकडे निरोप दिला तो अंगद ने लंका दरबारी जाऊन रावणासमोर सांगितला.अंगद रावणाला म्हणाला,"रावणा!लंकानगरीच्या प्रवेश द्वारावर श्रीराम आपल्या वानर सेनेसह समुद्र ओलांडून उभे ठाकले आहेत. अजूनही एकदा विचार कर,राघवास शरण जा आणि हे युद्ध होणे टाळ. ब्रम्ह देवाच्या आशीर्वादाने तू बलशाली झाला पण त्या बळाचा तू दुरूपयोग केला.