भगवद्गीता - अध्याय ३

  • 4.2k
  • 2.7k

तृतीय अध्यायकर्मयोगअर्जुन म्हणाला, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असे सांगतोस, आणि मला युद्ध करण्यास सांगतोस हे कसे, माझे मन तुझ्या बोलण्यामुळे संभ्रमात सापडले आहे. तू कृपया माझ्या हिताचा स्पष्ट मार्ग सांग.भगवान म्हणाले, माझ्या उपदेशात विरोधाभास नाही. बुद्धियोग सांगताना मी सांख्यमतही सांगितले. दोन्ही मार्ग एकच आहेत. कर्म केलेच नाही तर मुक्ति मिळणार नाही. आपल्या वाट्याला आलेले कर्म केेलेच पाहिजे. कर्म न करता आपण राहुच शकत नाही. जो मनुष्य कर्म करण्यास नाकारतो पण मनातुन विषयांचे चिंतन करत असतो तो स्वत:ला फसवत असतो. त्याला दांभिक म्हणावे.आसक्ति सोडुन कर्माचे आचरण करावे. स्वधर्माचे जो निष्काम वृत्तीने आचरण करतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. शास्त्राने नेमुन दिलेले कर्म करावे.