जोसेफाईन - 2

  • 7.5k
  • 5.2k

मागच्या भागात आपण जोसिफाईन,तिचा बॉयफ्रेंड आणि तिचा बॉस ह्यांबद्दल आणि त्यांच्या विचित्र वागण्याबद्दल पाहिलं पण त्यांचं असं वागणं का आणि केव्हा सुरू झालं ते आपण ह्या भागात पाहणार आहोत.एका प्रसिध्द सोसायटीत एक जोडपं नवीनच राहायला आले होते. लिफ्ट मधून त्यांच्या सामानाची ने आण सुरू झाली. वरचा मजला असल्याने बराच वेळ लागत होता. एकदाचं त्यांचं बस्तान बसलं. सुरुवातीपासूनच हे जोडपं वागायला थोडं विचित्र होतं. दिवसरात्र त्यांच्या घराचे पडदे बंद असत. घरात सतत अंधार करून ते बसलेले असत. कुठल्याश्या सायबर security वर आधारित असलेल्या गुप्त कंपनीत ते काम करीत असत. असं हे जोडपं होतं जोसिफाईन आणि तिचा बॉयफ्रेंड अनिल चे.कंपनीत जाताना जोसे.