उथळ पाण्याला खळखळाट फार

  • 6.1k
  • 2.7k

एका जंगलात एकमेकांजवळ दोन वृक्ष वाढलेले होते. एक झाड होतं उंचच उंच खजुराचे तर दुसरे झाड होते घेरदार,डेरेदार बेल फळाचे. त्याच जंगला जवळ एक गाव वसलेलं होतं. त्याचे नाव होते सज्जनपूर. सज्जन पूर मध्ये दोन पंडित राहत असत. एकाचे नाव होते कृष्णकांत तर दुसऱ्याचे नाव होते रमाकांत.कृष्णकांत रोड उंच आणि शिडशिडीत देहाचा होता तर रमाकांत हा जरा स्थूल देहाचा होता.रमाकांत च्या हाताखाली चार आणि कृष्णकांत च्या हाताखाली चार असे एकूण आठ शिष्य त्यांच्या आश्रमात शिकायचे. रमाकांत ची गालातल्या गालात हसण्याची लकब होती तर कृष्णकांत ची नाकात बोलायची लकब होती. रमाकांत पन्नास वर्षांचा होता तर कृष्णकांत साठीचा होता.रमाकांत अत्यंत संयमी,नम्र आणि