हनिमून इन नैनीताल

  • 4.9k
  • 1.9k

केदार ट्रॅव्हल्स ची नैनीताल हनिमून स्पेशल टूर बुक करून रजत घरी परतला. अगदी उत्साहाने त्याने रियाला बुकिंग तिकिट्स दाखवले. रियाने अतिशय आनंदाने रजतला मिठी मारली. रजत महाजन एक तीस वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनिअर मुंबईतील एका आय टी कंपनीत काम करणारा. आठ दिवसांपूर्वीच त्याचं लग्न त्याच्याच कंपनीत ग्राफिक्स डिझायनर असलेल्या अठावीस वर्षाच्या रिया देसाई शी झालं होतं. दोघांचे अरेंज मॅरेज होते. कोणालाही ऐकून कमाल वाटायची की एकाच कंपनीत काम करून दोघंही आधी एकमेकांना ओळखत नव्हते. रीतसर 'अनुकूल ' विवाह संस्थेत नाव नोंदवून तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती त्यानंतर त्यांना कळले की ते गेल्या चार वर्षांपासून एकाच कंपनीत कामाला होते म्हणून.दोघांच्या पत्रिका