सायलेन्स प्लीज - प्रकरण 12

  • 4.8k
  • 2.9k

प्रकरण 12पाणिनी च्या सुचने प्रमाणे कनक ओजस ने प्रांजल वाकनीस ला पाणिनी च्या ऑफिसात हजर केलं होत ! अत्ता या क्षणी ती पाणिनी समोर गुबगुबीत खुर्चीत बसली होती.“ तुला हे विचारायला बोलावलंय की विहंग खोपकर साठी काही करायची इच्छा आहे का? ” पाणिनी म्हणाला..“ अर्थातच.” “ तू निराश दिसतेस ” पाणिनी म्हणाला.“ निराश नाही नाराज आहे.का होऊ नये मी नाराज? अचानक एक माणूस माझ्या खांद्यावर हात ठेवतो आणि सांगतो अत्ताच्या अत्ता मी पाणिनी पटवर्धन ना भेटायला जायचं आहे.विचार करायला मला वेळ ही न देता अक्षरश: तो मला गाठोडं उचलल्या सारखं उचलून इथे आणतो याचा काय अर्थ समजायचा मी? ” प्रांजल