पान २ आता सगळ्यांचे पालक गेले होते , त्यामुळे आम्ही रूम मध्ये बसलो होतो . सगळेच एकमेकांना नवीन होते . त्यामुळे हळू हळू नाव विचारण्यापासून ओळख करून घेण्याचं काम चालू होत . तेवढ्यात एक घंटा झाली . वरच्या मजल्या वरच्या सगळ्या मुली खाली येताना आम्हाला दिसल्या . त्यांना विचारल्यावर समजलं , रोज संध्याकाळी ६.३० ला प्रार्थनेची बेल होते , आम्ही लगेच त्यांच्या मागे गेलो . नवीन होतो , म्हणून काहीच माहित नव्हतं ना ! सगळ्या मुली एका लाईन मध्ये बसल्या होत्या . आम्ही पण मागे बसणार तेवढ्यात आमच्या रेक्टर ( राजगिरे बाई ) म्हणाल्या ,