गीत रामायणा वरील विवेचन - 33 - पळविली रावणें सीता

  • 2.8k
  • 1.1k

छिन्न विच्छिन्न रथा समोरून आणखी पुढे गेल्यावर श्रीराम व लक्ष्मणांना एक महाकाय गरुड पक्षी मरणासन्न अवस्थेत दिसतो. त्याला बघताच कदाचित ह्यानेच सीतेला भक्षिली असावी अशी शंका श्रीरामांना येते. हा सुद्धा सुवर्ण मृगाचे रूप घेणाऱ्या मायावी राक्षसासारखा एखादा मायावी राक्षस असावा असे त्यांना वाटले. त्यामुळे ते त्याच्यावर बाण मारण्यासाठी रोखतात ते बघून तो महाकाय पक्षी म्हणतो,"हे रघुनाथा जो आधीच मरणाला टेकलेला आहे त्याला आपण का मारता आहात? मी पक्षीराज जटायू आहे. सूर्यदेव यांचा जो सारथी अरुण आहे त्याचा मी पुत्र जटायू आहे. मी दशरथ राजाचा मित्र आहे. आज माझी जी ही अवस्था झालीय ती सीता देवींना वाचवण्यासाठी जे मी शर्थीचे प्रयत्न