गीत रामायणा वरील विवेचन - 32 - लक्ष्मणा, तिचीच ही पाऊले

  • 3.2k
  • 1.2k

श्रीराम सीता देवींच्या वियोगाने व्यथित असतात. लक्ष्मण त्यांचे सांत्वन करतात त्यांना धीर देतात. काही वेळाने त्यांच्या मनोवस्थेत बदल होतो. त्यांचं नैराश्य कमी होते व आपण सीतेचा शोध घेतला पाहिजे असे त्यांना वाटते. कुटी जवळच्या आवारात हिंडणारे हरणं सारखे दक्षिण दिशेकडे बघत असतात जे बघून श्रीराम व लक्ष्मणांना कळते की नक्कीच सीता देवी ह्याच मार्गाने गेल्या असाव्यात.ते दोघे दक्षिण दिशेने मार्गक्रमण करू लागतात. थोडं अंतर गेल्यावर त्यांना काही चुरगळलेली फुलं दिसतात. ते फुलं सीतेच्याच केसांमधील आहेत ही ओळख श्रीरामांना पटते. काही पावलांच्या खुणा सुद्धा त्यांना आढळतात त्यावरून श्रीराम लक्ष्मणास म्हणतात,"हे पहा लक्ष्मणा हे फुलं आणि पदचिन्ह सीतेचेच आहेत. ह्याचाच अर्थ ती