युवराज आदित्य व पांढरा पक्षी

  • 16.5k
  • 1
  • 6.1k

युवराज आदित्य व पांढरा पक्षी पहाट कधीच उलटून गेली होती. चांदीच्या रत्नजडीत पलंगावर राजकुमार आदित्य निवांत झोपले होते. बाजूलाच एक दासी मोरपंखांच्या पंख्याने वारा घालत मंचकावर बसली होती. मध्येच राजकुमार झोपेतच हसले. दासीलाही हसू आल. कदाचित राजकुमार एखाद गोड स्वप्न बघत असावेत. " अग, रोहिणी अजून आदित्याला उठवलं नाहिस? " महाराणी निलवंती घाईघाईत आत येत म्हणाल्या. " राणी साहेब, राजकुमार गोड स्वप्नात गुंग आहेत. त्यांना कस उठवायच?" रोहिणी हसत म्हणाली. " गोड स्वप्न म्हणे..! अग आज राजकुमारांचा पंधरावा वाढदिवस आहे.काही वेळातच आचार्य धर्मानंद येतील... ओवाळून ...कुंकुम तिलक लावायचा आहे.....बाळ आदित्य.. आदित्य उठा..." आदित्य धडपडून जागा झाला.आळस देत त्याने विचारले... "