कोण? - 12

  • 4.9k
  • 3.1k

भाग – १२ शेवटी सावली तिचा स्वतःचा घरी एकदाची आली परंतु तिचा मानसिक आजारामुळे तिला अधून मधून तेथे जावे लागेल. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शरीराने स्वस्थ अशा सावलीला मानसिक ताण हि एक नवीन प्रकारची व्याधी आयुष्यात भेट म्हणून तिला मिळाला होती आणि तिला आता तिचा सोबतच संपूर्ण आयुष्य जगायचे होते. आता हळू हळू सावलीचे जीवन सुरळीतपणे व्हायला सुरु झाले होते. ती आणि तिचा परिवार मागील सगळा त्रास विसरून आता एका नवीन दिवसाप्रमाणे पुढील आयुष्य जगत होते. सावलीची तब्येत आता पूर्वीपेक्षा फार बरी म्हणजे एकदम फुल एन्ड फायनल झाली होती. तिला आता तिचा पूर्वीचा दिवसांप्रमाणे आपल्या दैनंदिन कार्यात व्यस्त व्हायचे होते.