आंतिम.... दिवस.. .! घटस्थापना.. लढ्याचा दिवस...मोक्ष भाग २७ देवपाडा गाव ... " कूकडू..कूंsss..कुकडू...कूंssss!" गावात कोणाच्या तरी घराबाहेरच कोंबड आरवल.. सकाळचे सात वाजले होते..आजची सकाळ देवपाड गाववासियांसाठी एक विळक्षण विचीत्र अनुभव घेऊन येत उगवली होती. बाकीच्या दिवसांप्रमाणे ह्या आज उगवलेल्या सकाळीच्या वातावरणात सुर्याचा प्रकाश नव्हता. पुर्णत देवपाडागावच्या , नाही नाही नुस्त गावावरच नाही - तर पुर्णत पृथ्वीवरच म्हंणायला हववर आकाशात झाकोळून आल होत. वर पाहता काळ्या जऊलधारी पाषाणी ढ़गांनी उभ्या आसमंताला काळ कवच घालून सुर्याचा प्रकाश अडवून धरलेल दिसत होता. हळू हळू वेळ पुढे सरकत होती.. सकाळच्या सुर्याचा प्रकाशच नाही, तर ती शरीराला मिळणारी ड जीवनसत्वे कोठून मिळणार.सकाळच्या पाव्हणे आठ वाजायच्या