किमयागार - 3

  • 5k
  • 3.6k

क्षितिजावर सोनेरी प्रकाश पसरला आणि सूर्योदय झाला. मुलाला वडिलांचे बोलणे आठवले व तो आनंदीत झाला. तो आतापर्यंत खूप शहरांतून फिरला होता आणि अनेक मुलींना भेटला होता पण आता तो ज्या मुलीला भेटणार होता तशी कोणी त्याला भेटली नव्हती.‌ त्याच्याकडे मेंढ्या होत्या, एक जाकीट व एक बदलता येण्यासारखे पुस्तक होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला मनासारखे फिरायला मिळणार होते. आणि अंदालुशिया च्या मैदानात फिरण्याचा कंटाळा आला तर मेंढ्या विकून तो समुद्रावर जाऊ शकत होता. आणि समुद्रावर फिरायचा कंटाळा येईपर्यंत तो अनेक शहरांमध्ये फिरलेला असेल, अनेक मुलींना भेटला असेल, त्याच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊन गेलेले असतील. तो नेहमी नवीन रस्ते शोधत