सीता गीत (कथामालीका) भाग २

  • 3.8k
  • 2.2k

रावण मला नेंत असतांना मी अंगावरील पाच सात दागिने काढून ते एका वस्रात बांधून पर्वतावर कांहीं वानर दिसत होते त्यांच्या दिशेने ते खाली टाकले. चारशे कोस दूर असलेल्या समुद्रापलीकडील लंका येथे मला कलंक लावण्यासाठी नेऊन ठेवले. तेथील अशोक वनात मला ठेवले. हजार राक्षसी माझ्यावर पहारा ठेवत होत्या. मी शोकसागरात बुडून गेले होते. मला एक क्षणही चैन पडत नव्हते. मी चिंताग्रस्त झाले होते. इंद्राणी माझ्यासाठी नाना परीचा थाट असलेले ताट पाठवत असे. स्वर्गीय अन्नपदार्थ पाठवत असे पण मी एखादाच खात असे. तिकडे दिव्य धनुर्धारी (श्रीराम) हे मारीचाचा (हरीणाचे रुपातील) वध करून मागे फिरले. मार्गात त्याना लक्ष्मणजी भेटले व त्यांनी श्रीरामांना वंदन