लक्ष्मण गीता.निषादराज गुह वनवासात श्रीरामांना भेटायला आले. त्यांना श्रीराम व सीतादेवी जमीनीवरती चटई वर बसलेले बघून त्याना वाईट वाटले. ते म्हणाले कैकेयीच्या कुटिलपणामुळे या दोघांना किती दुःखात टाकले आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणाले कोणी कोणाला सुख देत नाही की दुःख देत नाही. हे सर्व आपल्याच कर्माची फळे असतात. एखाद्या माणसाच्या मनात दुसऱ्याला काठी मारावी अशी इच्छा होते ती त्याच्या मनातील राग, द्वेष या संस्कारातून निर्माण होते. काठी मारण्यापासून तो स्वताला थांबवू शकतो पण त्यासाठी मनावर संयम असणे जरुरीचे आहे. पण त्याने जर मारले तर त्याच्या मनात मी याला काठीने मारले हा अहंकार उत्पन्न होतो व तो पापाचा धनी होतो. ज्याला मारले