आज आत्ता लगेच! "आज माझ्यावर पाहिजे तर मी उध्द्टपणे बोलतो म्हणून कारवाई करा;पण मी आज तुम्हाला खरं काय ते सूनवणारच!" ऑफिसात माझ्या हाताखाली काम करत असलेले माझे असिस्टंट माझ्यावर चांगलेच चिडले होते.... रिटायरमेंटसाठी थोडेच दिवस बाकी असलेले हे असिस्टंट माझ्या कामात मला हवी असलेली कारकूनी स्वरूपाची मदत करायचे. नुकतीच माझी बदली झालेल्या त्या परक्या गावात मला त्यांचा खूपच आधार वाटायचा... एका बाजूला आम्ही ऑफिसचे काम करत असतानाच विविध विषयांवर आमच्या मोकळेपणी गप्पाही चालू असायच्या... माझ्यापेक्षा आठ नऊ वर्षे वयाने जेष्ठ असलेले हे गृहस्थ बोलता बोलता माझ्यातल्या गुण आणि दोषांवरसुद्धा अधिकारवाणीने स्पष्टपणे बोट ठेवायचे.मला त्यांचे ते स्पष्ट परखड बोलणे सुरवातीला चांगलेच