गीत रामायणा वरील विवेचन - 26 - मागणे हे एक रामा, आपल्या द्या पादुका

  • 3k
  • 1.2k

भरत कुमारांची इच्छा असते की श्रीराम दिसताच त्यांना राजमुकुट घालून त्यांचा तिथेच राज्यभिषेक करून त्यांना परत आयोध्येस आणायचे त्यासाठी अयोध्या सोडतानाच भरत मुनिवस्त्र परिधान करतात. परंतु श्रीराम त्यांना राजवस्त्र परिधान करण्यास व राजमुकुट घालून राज्यपद सांभाळ असे सांगतात. आणि चौदा वर्षे होईपर्यंत मी परत अयोध्येला येणार नाही असे निक्षून सांगतात. तेव्हा भरताचा नाईलाज होतो. जसे श्रीराम निश्चयी व तत्ववादी असतात त्याप्रमाणेच श्रीरामांचे बंधू असल्याने भरत सुद्धा तेवढेच निश्चयी व तत्ववादी असतात. ते श्रीरामांना म्हणतात, "तात गेले माय असून नसल्यासारखीच आहे त्यामुळे मला अनाथ झाल्यासारखं वाटते. कोणाचाच आधार वाटत नाही. आपण आयोध्येस आले असते तर आपला आधार वाटला असता पण आपण