किमयागार - 1

  • 17.3k
  • 2
  • 9.9k

Alchemist या इंग्रजी पुस्तकाचे हे भावांतर आहे.किमयागार - सुरुवातत्या मुलाचे नांव सॅंटीआगो. तो मेंढपाळ होता. संध्याकाळ झाली होती. तो मेंढ्याना घेऊन प्रवास करत एका उजाड चर्चजवळ पोहोचला होता. त्या चर्चचे छप्पर उडाले होते. तेथे खुप उंबराची झाडे होती. त्याने ती रात्र तिथे काढायचे ठरवले. त्याने सर्व मेंढ्या दरवाजातून आत आल्याची खात्री केली व आजुबाजुने लाकडे लावली जेणेकरून कळपातील कोणी इकडे तिकडे जाऊ नये. त्या भागात लांडगे जरी नसले तरी एखादी मेंढी चुकली असती तर त्याचा दुसरा दिवस शोधण्यात गेला असता. त्याने आपल्या अंगावरील जाकीट खाली पसरले, व तो वाचत असलेले पुस्तक उशीसारखे घेतले. त्याच्या मनात आले आता थोडे जाड पुस्तक