मुरारीचा खून - भाग 1

  • 12.4k
  • 6.3k

गुप्तहेर गोगटे हा एक खाजगी गुप्तहेर होता. विक्रांत रामानंद गोगटे हा दिल्ली शहरातील प्रसिद्ध गुप्तहेर होता. त्याची फी होती फक्त 125 रुपये.  तो केसेस अशा पद्धतीने सोडवायचा की सगळे लोक चकित व्हायचे. विक्रांत गोगटेने एखादी केस हातात घेतली म्हणजे तो खुनी किंवा चोर पकडला जाणारच असा दिल्लीतल्या सर्वच लोकांचा समज होता. एकदा शहरातला एक धनवान माणूस, मुरारी आनंदकुमार दत्ता, गोगटेकडे आला व म्हणाला, “विक्रांत, तू प्रसिद्ध गुप्तहेर आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलोय. मला ठार मारायची कोणीतरी धमकी देत आहे”. हे बघ, असे म्हणून मुरारी दत्ताने कागद काढला, ज्याच्यावर लिहिले होते मी तुला मारून टाकेन लवकरच------ तुझीच मीना.  हे वाचून विक्रांत