गीत रामायणा वरील विवेचन - 25 - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

  • 3.1k
  • 1.3k

पर्णकुटी पासून थोड्या अंतरावर रथ आणि सैन्य थांबवून भरत श्रीरामांना भेटायला येतात. इकडे लक्ष्मणास गैरसमज झाला असल्याने तो भरताच्या अंगावर धावून जायला निघतो पण श्रीराम त्याला थांबवतात आणि शांत राहण्यास सांगतात. त्यावर लक्ष्मण धुमसत तिथेच सावध पवित्र्यात उभा राहतो. भरत येताच श्रीरामांच्या पायावर नतमस्तक होतो. व आपल्या अश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक घालतो. श्रीराम सुद्धा सद्गदीत होतात व भरतास उठवून त्याला आपल्या छातीशी घट्ट धरून त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मणाचा क्रोध भरताच्या अश्या वागण्याने क्षणात मावळतो. आणि त्याच्याही डोळ्यात अश्रू जमा होतात. जानकी देवींना सुद्धा गहिवरून येते. भरत श्रीरामांना दशरथ राजे गेल्याची बातमी सांगतो ते