श्रीरामाच्या शोधात भरत मोठे सैन्य घेऊन ज्या दिशेने श्रीराम गेले त्याच दिशेने मार्गक्रमण करू लागले. भरताचा सैन्य घेण्याचा एकच उद्देश की जेवढे जास्त लोकं सोबत घेऊ तेवढे जण रामाला शोधण्यास उपयोगी पडतील व श्रीराम लवकरात लवकर दिसेल. रस्त्यात असणाऱ्या वाटसरू मंडळींनी, आश्रमातील ऋषीगणांनी श्रीराम कुठे गेले? कुठल्या दिशेने गेले हे भरतास अचूक सांगितले त्यामुळे भरत कुमार सैन्यासह श्रीराम जिथे पर्णकुटी बांधून राहत होते तेथे त्या दिशेने हळूहळू येऊ लागले. जसजसे ते सैन्य जवळजवळ येऊ लागले तसतसे त्यांच्या पावलांमुळे धुळीचे लोट उठू लागले. ते बाहेरच उभ्या असलेल्या लक्ष्मणास दिसले. व ते श्रीरामांना म्हणू लागले, "श्रीरामा जानकी देवींना सुरक्षेच्या दृष्टीने आत पर्णकुटीत