गीत रामायणा वरील विवेचन - 22 - जाहला चोहीकडे अंधार

  • 3k
  • 1.3k

मंत्री सुमंत दशरथ राजास श्रीरामांचा संदेश कथन करतात. दशरथ राजा तो संदेश ऐकून भावनातिरेकाने आक्रन्दू लागतात. त्यांच्या डोळ्याला अश्रूंची धार लागते. "पहा सुमंता! माझा श्रीराम किती गुणी आहे. स्वतः वनवासात असून त्याला त्याच्या माता पित्याची काळजी वाटते. आपले आईवडील शोकाकुल राहू नये म्हणून त्याच्या मनाची होणारी धडपड त्याच्या संदेशातून प्रतीत होतेय. माझ्या कैकयी ला वर देण्यामुळे आज तो जानकी व लक्ष्मण वनवासात फकिराप्रमाणे जगत आहेत पण त्याबद्दल त्याचा कोणावरही राग नाही. पहा कसा दैवदुर्विलास आहे. श्रीरामासारखा मोठ्यामनाचा गुणी पुत्र मला लाभला म्हणून मी भाग्यवान ही आहे आणि अश्या पुत्राला माझ्यामुळे वनात जावे लागले म्हणून मी कमनशिबी सुद्धा आहे. इथे राजप्रासादात