गीत रामायणा वरील विवेचन - 19 - नकोस नौके परत फिरू ग

  • 2.8k
  • 1.2k

श्रीरामांचा रथ चालत चालत गंगातीरी शृंगवेरपूर नगराच्या सीमेवर येऊन थांबला. तेथपर्यंत आलेल्या अयोध्येतील लोकांना श्रीरामांनी मोठ्या कष्टाने निरोप देऊन परत जाण्यास सांगितले त्यामुळे ते जड अंतकरणाने अयोध्येच्या दिशेने चालू लागले. तेथून नदी पार करून श्रीरामांना पैल तीरी जावयाचे होते. परंतु रात्र झाल्यामुळे त्यांना मुक्काम करणे आवश्यक होते. गंगातीरी असणाऱ्या नावाडी लोकांनी तो रथ बघितला व त्यातून तीन तेजस्वी व्यक्ती बाहेर आलेल्या बघितल्या ते लगेच आपल्या समुदायाच्या म्होरक्याला म्हणजेच निषादराज गृह ह्याला सांगायला गेले. श्रीरामांची कीर्ती सर्वत्र पसरल्यामुळे निषाद राजाला नावाड्यांच्या आणि कोळ्यांच्या तोंडून ऐकलेल्या वर्णनाने हे कळलं की कोणीतरी असामान्य व्यक्ती नदीतीरी आलेल्या आहेत. तो लगेच नदीतीरी त्यांना भेटण्यास गेला