गीत रामायणा वरील विवेचन - 18 - थांब सुमंता, थांबवी रे रथ

  • 2.9k
  • 1.2k

देवी सीतेची विनंती अखेर श्रीराम मान्य करतात व त्यांना आपल्या सह येण्यास अनुज्ञा देतात. लक्ष्मण सुद्धा उर्मिला देवींचा निरोप घ्यायला त्यांच्या कक्षात जातात. "उर्मिले तुला कळले असेलच की भ्राताश्री ला वनवासात जावे लागते आहे व त्यांच्यासोबत मी सुद्धा जाणार आहे. मी इथे नसताना पिताश्री माताश्री यांची काळजी घे. स्वतःची काळजी घे.",लक्ष्मण कुमार "देवी जानकी जर भ्राताश्री सोबत येऊ शकतात तर मी आपल्या सवे का येऊ शकत नाही? विवाहापश्चात पत्नीने आपल्या पतीसोबतच राहणे उचित होणार नाही का? देवी जानकींना एक नियम व मला एक नियम असे का?",उर्मिला देवी "देवी जानकी हट्ट करून भ्राताश्रीं सोबत येणार आहेत परंतु तू तो हट्ट करू