ती एक वेश्या - भाग 1

  • 15.6k
  • 8.4k

"का ........का .......केलास तू असं ????हा दिवस मला बघायला मिळण्यापेक्षा तू मला मारून टाकायचं होत ना ......" असं जोरात म्हणत , ओरडत ती हात आपटत समोरचा फ्लॉवर पॉट आणि समोर येईल ते फेकून देत होती . जोरजोरात रडत होती ती . रागाचा उद्रेक होत होता तिचा .अक्षरशः थरथरत होती ती .स्वतःच्या आई बद्दल समजल्यावर तिला स्वतःची किळस येत होती कि आपली आई असं काम करते आणि एवढी वर्ष त्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं . आपल्या आई ने एवढी वर्ष आपल्यापासून लपवलं आणि आपण त्यावर विश्वास ठेवला हेच आठवून आठवून तिला स्वतःची चीड येत होती . तिच्या आईने हजारदा बजावून सुद्धा