सायलेन्स प्लीज - प्रकरण 2

  • 5.9k
  • 4k

प्रकरण २ “सॉरी, मी एकदम दांडगाई केल्या प्रमाणे आत आलो. मला एकदम नैराश्य आलय आणि मला अस होतं तेव्हा मी असचं विचित्र वागतो..” माझी भाची ज्योतिष जाणते.तिला माझी कुंडली माहिती आहे.मला मात्र त्यावर बिलकुल विश्वास नाही.पण तरीही तिने सांगितलेली गोष्ट माझ्या मनातून जात नाही.ती म्हणते मी वकिलाचा सल्ला घ्यायला हवा . आणि असा वकील गाठायला हवा ही त्याच्या आडनावात पाच अक्षरे आहेत.मी शहरातले सगळे वकील पालथे घातले आणि पाच अक्षरे असलेल्या आडनावाचे आणि सर्वात चांगले नाव तुमचे होते, मी ते भाचीला सांगितल्यावर ती म्हणाली तुम्हालाच भेटले पाहिजे मी. काय फालतू पणा आहे हा ! पण तरीही मी तिचे ऐकून आलोय.”