मल्ल प्रेमयुद्ध - भाग 50

  • 4.2k
  • 2.3k

मल्ल- प्रेमयुद्ध" थांबा सुनबाई तुमी ह्या घरच्या सुनबाई हाय... आता हा उंबरा आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही ओलांडायचा नाय..." आबांच्या चेहऱ्यावर राग होता आणि क्रांतीच्या डोळ्यात अश्रू....क्रांतीने पुढे टाकलेले पाऊल मागे घेतले."थांब क्रांती अजिबात पाऊल माग घीवु नगस... म्या हाय तुझ्या संग" सुलोचनाबाई आबांच्या नजरेला नजर देत म्हणाल्या. तरीसुद्धा क्रांती मागे आली आणि आबांच्या पाय पडली."आबा या सगळ्यासाठी तुमचं आशीर्वाद लागणार हायत ना... आबा जाऊबाई आत्याबाईंनी तुमचं ऐकलं कारण..." "कारण त्या अमास्नी अन देत्यात म्हण..." आबा रागानं म्हणाल"न्हाई आबासाहेब हा तुमचा गैरसमज हाय... त्या तुमास्नी घाबरत्यात... किती गोष्टीत त्यांनी जीव मारून घेतलाय स्वतःचा पण आबा मी हे सगळं सहन करणारी मुलगी न्हाय...