ती अनोखी रात्र - 1

  • 13k
  • 5k

रात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा घड्याळात २ वाजले होते. यावेळी मला जाग येणे काही नवल नव्हते. मी किचन मध्ये गेले पाणी प्यायले आणि थोडी फ्रेश झाले. पुन्हा आपल्या रूम मध्ये परत आले. पूर्ण घरात मी एकटीच होते. माझ्याकडे फोनही नव्हता. कॉलेजला सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी माझ्या आत्या च्या घरी गावी आले होते. माझी आत्या आणि तिचा मुलगा अचानक काम आल्यामुळे मुंबईला गेले होते. माझी झोप पूर्णपणे उडाली होती त्यामुळे आता एक-दोन तास तरी काही झोप येणे शक्य नव्हते. म्हणून मी माझ्या आवडीचे काम करत बसले होते. मला वेगवेगळ्या ठिकाणांची, वस्तूंचा विचार करायला खूप आवडत होते. माझे कोणीही मित्र-मैत्रिणी