ऑनलाईन प्रेम

  • 5k
  • 1.7k

"कायरे हा अक्की(आकाश) सारखा काय ऑनलाइन असतो,ऑफिस काम झालं तरी घरी जायची घाई नसते त्याला,लंच ब्रेक मध्ये सुद्धा लवकर येत नाही हा,काय भानगड काय आहे?",सुबोध स्वप्नील ला म्हणाला."अरे ऑनलाइन फेसबुक वर मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायच्या आणि मग चॅटिंग सुरू करायची आणि स्टेप बाय स्टेप पुढे जात प्रेमा पर्यंत गाडी न्यायची असं चाललेलं आहे त्याचं",स्वप्नील म्हणाला."अरे पण ऑनलाइन प्रेमात कितपत विश्वास ठेवणार समोरच्या माणसावर, त्याची खात्री कोण देणार? उगीच वेळ घालवतोय हा आकाश",सुबोध म्हणाला."बघ बघ तिकडे,आकाश नी पूर्ण परफ्युम ची बाटली स्वतः वर रिकामी केली,नुसता घमघमाट, आणि कशासाठी तर ऑनलाइन मीटिंग साठी. हा हा हा आता त्या फेसबुक वरच्या मुलीला वास