गीत रामायणा वरील विवेचन - 17 - जेथे राघव तेथे सीता

  • 2.5k
  • 1.1k

माता सुमित्रेचा आशीर्वाद घेण्यास श्रीराम व लक्ष्मण जातात. "माते आम्हाला आशीर्वाद दे की आम्ही लवकरात लवकर चौदा वर्षे वनवास पूर्ण करून येऊ.",श्रीराम व लक्ष्मण माता सुमित्रा सुद्धा सद् गदीत होतात. त्यांना गहिवरून येते. त्यावर श्रीराम म्हणतात, "माता कौसल्या व आपली मनःस्थिती, चिंता मला समजतेय. कुठल्या आईचे हृदय पुत्रवियोगाने द्रवणार नाही! परंतु काही कर्तव्ये पार पाडावीच लागतात. आपण अश्या धीर खचवला तर माता कौसल्ये कडे कोण लक्ष देणार? ",श्रीराम श्रीरामांचे बोलणे ऐकून थोड्यावेळाने त्या स्वतःला सावरून दोघांनाही आशीर्वाद देतात. "लक्ष्मणा मला आज तुझा अभिमान वाटतो आपल्या ज्येष्ठ भ्राता सोबत जाऊन तू कनिष्ठ बंधूचे कर्तव्यच पालन करतो आहेस. माझा तुम्हा दोघांना आशीर्वाद