कैकयी चा दुराग्रह बघून राजा दशरथाची प्रकृती बिघडते. कैकयी चा विचित्र हट्ट आणि त्यामुळे दशरथाची ढासळलेली प्रकृती राजवाड्यात ही बातमी हळूहळू पसरते. श्रीराम आपल्या वडिलांना बघायला कैकयी च्या कक्षात येतात. तेव्हा त्यांचे वडील तर काही सांगू शकत नाहीत पण कैकयी मात्र निर्लज्ज पणे श्रीरामास तिने मागितलेल्या दोन वरांबद्दल सांगते आणि ते जर पूर्ण झाले नाहीत तर रघुकुलास कमीपणा येईल असे सांगते. ते ऐकताच श्रीराम आपल्या पिताश्रींना म्हणतात, "हे तात आपण स्वतः ला दोषी समजू नये. मी आपण दिलेलं वचन नक्की पूर्ण करेल. मला वनवासात जाण्यास काहीही आपत्ती नाही." "श्रीरामा वर मी दिलेले आहेत पण ते तू पूर्ण केलेच पाहिजे असे