मल्ल प्रेमयुद्ध - भाग 48

  • 3.8k
  • 2.3k

मल्ल प्रेम युद्धवीरने इकडेतिकडे शोधला. उशीखाली पुन्हा फोन सापडला."चिनूचा फोन राहिला." ऋषि म्हणाला."एक काम करा सगळे इथंच बसा कशाला फोनच निमित्त करून येताय सारख..." वीर चिडला. सगळे खो खो करून हसत होत. " बघितलं का तुमची चांगली माणस..." वीर क्रांतीला म्हणाला.स्वप्ना भूषणकडे बघटसुद्धा नव्हती. तिने वीरच्या हातात एक बॅग दिली. वीरने ती बाजूला ठेवली. "वीर..." स्वप्ना"I love you..." स्वप्ना म्हणाली. सगळे तिच्याकडे बघायला लागले. भूषणला काही सुचत नव्हते. वीरसुद्धा अवाक होऊन तिच्याकडं बघत होता. स्वप्नाने भूषणला डोळा मारला आणि ती लाजून निघून गेली. भूषण हसला, सकाळपासन आपण याच तीन शब्दांची वाट बघत व्हतो आणि असा सगळ्यांना धक्का देऊन ती तीन